Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांना बसने दिली जोरदार धडक

by Divya Jalgaon Team
June 22, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

जळगाव प्रतिनिधी । घरी परतणार्‍या दोन दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने धावणार्‍या बसने धडक दिल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन किरकोळ जखमी झाले आहेत.

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी लिलाबाई धोंडू सोनार यांना मुतखड्याचा त्रास होत होता. यामुळे त्यांचा मुलगा बाळू धोंडू सोनार याने जळगाव येथील इएसआयसीच्या कार्यालयात येण्याचे ठरविले. यानुसार आज तो आपला मित्र गजानन व पत्नी आणि मुलासह आज जळगावला आला होता. येथील काम आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे सर्व जण दोन दुचाकींवरून घरी परत निघाले होते.

कुसुंबा गावाजवळ जळगाव-सोयगाव या भरधाव वेगाने धावणार्‍या बसने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीवर स्वार असणारे लिलाबाई धोंडू सोनार (वय५५) आणि गजानन किसन बावस्कर ( वय ३२ चिंचखेडा ता. जामनेर) हे जागीच ठार झाले. तर दुसर्‍या दुचाकीलाही बसने धडक दिली. यात बाळू धोंडू सोनार, त्यांची पत्नी सुनीता आणि योगेश हे किरकोळ जखमी झाले. त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह सिव्हील हॉस्पीटलला पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Share post
Previous Post

दिव्यांगाना कोरोना लसीकरणासाठी लस उपल्बध करून द्यावे

Next Post

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत

Next Post
कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group