जळगाव, प्रतिनिधी । चिकन विक्री करणाऱ्या दोघे विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याने आज सकाळच्या सुमारास दोघांनी एकमेकांवर कोयत्याने वार करून दोघी गंभीर जखमी झाल्याची माहिती घडली. याप्रकरणी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शहरातील शिव कॉलनी परिसरात हॉटेल चिनार गार्डन जवळ चिकन विक्रेते चिकन विक्रीसाठी स्टॉल मांडून बसतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जळगाव चिकन सेंटर सद्दाम मेहमूद खाटीक (वय-27)रा.तंबापुरा आणि लालूभाऊ चिकन सेंटर चे इम्रान गमीर खाटीक विक्रेत्यांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने दोघांनी शस्त्रे हातात घेतले आणि एकमेकांवर वार केले.
या घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे तर इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.