Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

‘गोलाणी’तील तळमजल्यात साचलेल्या सांडपाण्याचा निचरा जीव धोक्यात घालून केल्याची घेतली दखल

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट येथील कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याची व अथक परिश्रमाची गंभीरपणे दखल घेऊन आज सर्व कर्मचार्‍यांना महापौर दालनात बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि ठिकठिकाणी साचणारे कचरा, फुले, भाजीपाल्याच्या घाणीचे ढीग ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली होती. यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जात होत्या.

मात्र, हा प्रश्न कायमच होता. या अनुषंगाने शुक्रवारी, दि. 18 जून 2021 रोजी वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्‍याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तेथे आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालत कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला.

दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेशही दिले होते. त्यानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, सफाई कामगार बबलू गायकवाड, रणजित सनकत, परभत नाडे, रोहित सारसर, विजय नाडे, आनंद सपकाळे, गफ्फार सय्यद, सतीश पवार, उमेश बेडपाल, भगवान डाबोरे या कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याची व अथक परिश्रमाची गंभीरपणे दखल घेऊन आज, दि. 21 जून 2021 रोजी संबंधित सर्व कर्मचार्‍यांना महापौर दालनात बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी यापुढेही सतत आपणाकडून अशाच पद्धतीचे काम अपेक्षित असल्याचे सांगत संबंधित कर्मचार्‍यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले. त्यावर आजपर्यंत अशा पद्धतीने कधीच आमच्या कामाची दखल घेतली गेली नाही. मात्र, तुम्ही महापौर, उपमहापौर झाल्यानंतर आमच्या कामाची दखल घेतली, याचे आम्हाला समाधान असल्याची भावना यावेळी संबंधित कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त पवन पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

Share post
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group