जळगाव – ‘अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ’ च्या खेळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जळगांवची वूमन फिडे मास्टर भाग्यश्री पाटील हिने ११ फेरीत ९ गुण मिळवत प्रतिष्ठेच्या १६ वर्षाआतील ऑनलाइन राष्ट्रीय स्पर्धचे विजेतेपद मिळविले.
ह्या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण १८६ खेळाडूंचा सहभाग होता. यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेची विजेतेपद जिंकणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे. या कामगिरीमुळे भाग्यश्री हिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
या आधी देखील भाग्यश्री हिने ७ वर्षाआतील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद व जागतिक १० वर्षाआतील स्पर्धेत तिसरा क्रमांक तसेच अनेक अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार पटकाविले आहेत.
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असला तरी जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी साठी सुध्दा ही बातमी महत्व पूर्ण अशी असली तरी तिचा जल्लोष कोविड मुळे करता येत नसल्याची खंत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख यांनी व्यक्त केली.
भाग्यश्री ही सुद्धा हल्ली नाशिक येथे असल्याने या महामारी मध्ये तिचे फक्त दूरध्वनीद्वारे संपूर्ण संघटनेने अभिनंदन केले आहे त्यात प्रामुख्याने अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, सहसचिव संजय पाटील, शकील देशपांडे, अतुल मेहता ,आर के पाटील,चंद्रशेखर देशमुख,पी के करणकर , अरविंद देशपांडे,नरेंद्र पाटील,रवींद्र धर्मधिकारी, एडवोकेट अंजली कुलकर्णी,तेजस तायडे, प्रवीण ठाकरे आदींनी तिचे अभिनंदन केले.
संपूर्ण बुध्दिबळ प्रवासात भाग्यश्रीला सतत पाठिंबा दिल्याबद्दल अशोक भाऊ जैन व अतुल भाऊ यांचे विशेष आभार जिल्हा सनघटने तर्फे व्यक्त करण्यात आले तसेच भाग्यश्री च्या पालकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.