जळगाव- इस्लाम धर्मात प्रेषित मोहंमद सर्वोच्च स्थान आहे. अशा प्रेषितांचा अपमान फ्रान्समध्ये केला जात असल्याने मॅक्रॉनचा सुन्नी जामा मशीदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, पवित्र इस्लाम धर्मात अल्लाहनंतर सर्वांत जास्त महत्व, मान व सन्मान हे प्रेषित मोहंमद यांनी देण्यात आलेला आहे. जगभरातील मुस्लिम बांधवांना प्रेषितांचे सन्मान व प्रेमापेक्षा अधिक प्रिय आहे. असे असतांना फ्रान्समध्ये कार्टुन बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रेषितांचे अपमान केला जात आहे.
तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी सर्व सिमा ओलांडल्या आहे. प्रेषितांच्या संदर्भात अपमान जनक घोषणा केली आहे. या घोषणांचा जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यासंदर्भात पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी कार्यालयाफार्मत निवेदन देण्यात आले.