जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील इदगाह कब्रस्थानजवळ भरधाव ट्रकने वीज खांबाला जोरदार धडक दिल्याची घटना 13 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महावितरण अभियंत्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील टॉवर चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरुन मंगळवारी एम.एच.20 ए.टी. 2965 हा ट्रक जात होता. यादरम्यान ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक ईदगाह मैदानाजवळ असलेल्या महावितरणच्या खांबावर धडकला. धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात विद्युत पोल खाली कोसळून वीजतारा तुटल्या व नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता उमेश पंडीत घुगे रा. सिंधी कॉलनी, यांनी घटनास्थळ गाठले. कोसळलेल्या वीजखांबा, तसेच तुटलेल्या तारा याची पाहणी केल्यावर त्यांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. इलेक्ट्रीक पोल वाकून 22 हजार रुपयांच्या नुकसान झाल्याच्या तक्रारीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील हे करीत आहेत.