जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनाबाधित आजाराने ग्रस्त वृद्धावर तब्बल दोन महिने यशस्वी उपचार केल्यानंतर बुधवारी ९ रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज कार्ड देऊन निरोप देण्यात आला. या वृद्धाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील ६९ वर्षीय वृद्धाला कोरोना बाधित झाल्यामुळे १५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला मूत्राशयात देखील इंन्फेकशन झाले होते. लघवी करण्यास देखील त्रास होता. त्यासाठी शल्यचिकित्सा विभागाच्या मदतीने वृद्धावर उपचार करण्यात आले. तसेच रुग्णाला ७ दिवस श्वास घ्यायला देखील त्रास झाला होता . त्यामुळे औषधौपचार करून या वृद्धाला औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या निगराणीखाली सुमारे दोन महिने यशस्वीपणे उपचार करण्यात आले.
या वृद्धाला बुधवारी ९ जून रोजी अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी वृद्धाने रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. यावेळी डॉ बी डी नाखले, सहयोगी प्रा डॉ विजय गायकवाड, डॉ आस्था गनेरीवाल, डॉ इम्रान पठाण आदी उपस्थित होते.
उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ बी डी नाखले, सहयोगी प्रा डॉ विजय गायकवाड, डॉ आस्था गनेरीवाल, डॉ नेहा चौधरी, डॉ स्वप्निल चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. रोहन केळकर, डॉ. शाल्मी खानापूरकर, शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उपअधिष्ठता डॉ मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ उमेश जाधव, डॉ किरण अहिरे आदी सह वार्ड इन्चार्ज परिचारिका शैला शिंदे, सुषमा तायडे, यश ढंढोरे, मालविका पाटील, शीतल सोनवणे आदींनी उपचार करण्याकामी परिश्रम घेतले.