जळगाव – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांचे अधीनस्त कार्यालयातील निर्लेखित शासकीय वाहन तसेच गुन्हे अन्वेषणात जप्त करण्यात आलेले ट्रक, मोटार सायकल तसेच इतर मुद्देमालाचा जाहीर लिलाव दिनांक २४ जून, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
तरी लिलावात सहभागी होण्याकरीता अटी, शर्ती व आवश्यक त्या बाबींची माहिती अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांचे कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडीया, मुख्य शाखेसमोर, जिल्हापेठ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहिल. असे सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.