जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलीत उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनदा मातांना खजूर पॅकेटचे वाटप करण्यात आले.
उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे कोरोना काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनदा मातांना खजूर पॅकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, विनोद शिरसाळे, धनराज कासट, सागर मुंदडा, अंकिता मुंदडा उपस्थित होते.