मुंबई – मॉरीशसचे माजी प्रधानमंत्री व माजी राष्ट्रपती अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे महाराष्ट्राचे राजपुष्प असलेल्या तामण वृक्षाचे रोप लावले. अनिरुद्ध जगन्नाथ यांचे नुकतेच निधन झाले.
श्री अनिरुद्ध जगन्नाथ यांनी पदावर असताना राजभवन येथे भेट दिली होती याची नोंद घेऊन राज्यपालांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या निवासस्थानाबाहेर तामण वृक्षाचे (प्राईड ऑफ इंडिया) रोप लावले.
जगन्नाथ यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राजभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.
आज जागतिक पर्यावरण दिनदेखील आहे. या दिनाचे औचित्य साधून राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राजभवनाच्या हिरवळीवर वृक्षारोपण केले.