मुंबई प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली असून यावेळी जिल्ह्यातील घडामोडीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली. ते रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर काल पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्येतीबाबत विचारपूस केली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे देखील उपस्थित होते.