भुसावळ – शहरातील जाम मोहल्ला भागातील महिलेची सात ते आठ जणांनी छेड काढल्याचा कारणावरून वाईट वाटल्याने दोन गटात रात्रीच्या सुमारास हाणामारी झाल्याची घटना घडल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शेख इब्राहीम शेख रहीम राहणार जाम मोहल्ला मच्छिवाडा भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २८/५/२०२१ रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास आरोपी (१) तेहरिन शेख (२) तोहीब शेख (३) उबेद शेख (४) अाकीद शेख (५) जशीन शेख (६) फरीद मच्छिवाला यांची दोन मुले (७) गंगा मच्छि (८) सलमान पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार भुसावळ मधील असून फिर्यादीच्या घरातील महिलेची छेड काढत असतांना वाद झाला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २८/५/२०२१ रोजी गुरुन २२२/२०२१ भाग -५ भादवि कलम ३०७,३२६,४५२,१४३,१४७,१४८,१४९,४२७, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर फिर्यादी तेहरिन नाशिर शेख राहणार मच्छिवाडा भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील मच्छिवाडा भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २८/५/२०२१ रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास आरोपी (१) रिजवान शेख उर्फे टिल्लू (२) शेख इम्रान शेख गफूर (३) शेख तोहीब शेख इम्रान (४) बिस्मिल्ला शेख रहीम (५) गुड्डू चुरण विकणारा (६) शेख इरफान शेख रहीम (७) शेख इब्रान शेख रहीम सर्व राहणार मच्छिवाडा भुसावळ मधील असून वरील आरोपींना महिलेची छेड काढल्याने आरोपितांना वाईट वाटल्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका लोखंडी रॉड तसेच उबेर शेख याने चाकूने डाव्या हातावर मारून जखमी केले.फिर्यादीच्या भाऊ बिस्मिल्ला यास जिवेठार मारण्याच्या उद्देशाने तलवार मारली असता गंभीर दुखापत केली.तसेच फिर्यादीच्या वडील रहीम यांच्या डोक्यावर रॉडने मारून जखमी केले.जीवेठार मारण्याच्या उद्देशाने घरात येऊन घरातील सामानाची तोडफोड करून महिलांना सुद्धा मारहाण केली यावेळी आरोपितांकडे एक चाकू,एक तलवार,दोन लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्या वापर केल्याची माहिती फिर्यादीने दिली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला मा.पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुरुन २२३/२०२१ भाग -५ भा.द. वि.कलम ३२४,१४३,१४७, १४८,१४९,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघे गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.