जळगाव – मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशा नंतर पुन्हा एकदा भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेतील एकूण तीन भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुरेश सोनवणे, सौ शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ या भाजपाच्या तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेना सचिव विनायक राऊत, संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थित शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.
तसेच ज्या नगरसेवकाला भाजपने सर्व नगरसेवकांची नाराजी पटकून उपमहापौर पदाच्या उमेदवारांची संधी दिली त्याच भाजप नगरसेवक असलेल्या सुरेश सोनवणे यांनी भाजप सोबत धोखा करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे या घटनेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मनपा निवडणुकी वेळी राष्ट्रवादी मधून आयात झालेले सुरेश सोनवणे यांचा या कृतीचा भाजपला चांगला धक्का बसला आहे.
महत्वाचे म्हणजे च्या प्रिप्राळा परिसरातून महापौर पदाच्या उमेदवारी करीता प्रतिभा कापसे यांना उमेदवारी देण्यात आली नेमक्या त्याच परिसरातून भाजप नगरसेवक सुरेश सोनवणे यांना उपमहापौर पदाच्या उमेदवारांची संधी देण्यात आली होती मात्र नाराज नगरसेवकांचा सुरेश सोनवणे यांचा नावाला विरोध होता.