जळगाव – मराठा स्पोर्ट फौंडेशन संचालित एम पी एल व लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट फौंडेशन संचलित एल पी एल जळगांव हया संस्था खऱ्या अर्थाने खेळ भावना जोपासन्यासाठी उदयास आल्या.पण जगात कोरोनाचा कहर सुरू झाला आणि समाजाला मदतीची गरज भासू लागली. समाजातील गोरगरिबांच्या मदतीला आपण धावले पाहिजे आपण कोविड सेन्टर सुरू करावे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी गेले असता मोहाडी येथे सुरू होणाऱ्या नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दि. 8 एप्रिल 2021 ला मोहाडी कोविड हॉस्पिटल सुरू झाले.
त्या ठिकाणी दाखल गोरगरीब रुग्णांना संपूर्ण जबाबदारी उचलली ती एम पी एल व एल पी एल या संस्थांनी समाजातील समाज बांधवांना आव्हान केले असता मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये रोख रक्कम, गव्हू, तांदूळ, डाळी, पोहे, कांदे, फळे, चहाचे कप, जेवणाचे साहित्य, दूध, तेल कॅन, तुपाचे डब्बे अशी मदत मिळू लागली. मग कामाचा खर्च बघता इतर समाजातील दानशूर व्यक्तीना मदतीचे आव्हान केले असता, त्यांची भरभरून मदत करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला 120 रुग्ण,40 स्टाफ, अंबुलन्स ड्रायव्हर, वॉर्डबॉय अशी 181 लोकांची सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण,4 वा चहा, रात्री जेवण देण्यास सुरुवात झाली. यासाठी महिला कोविड हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी यांनी किचन साठी स्वतंत्र व्यवस्था एक हॉल देऊन केली. यासाठी एक स्वयंपाकी, त्याच्या मदतीला 6 ते 8 कामगार नेमून दिले. सकाळी रुग्णांना नास्ता यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ अंडी, मटकी, दूध, उसळ, उपमा, गुळाचा शिरा, इडली,फळे, अलुचना व काढा दिला जातो. दुपारी जेवणात पोळी, भाजी, डाळ-भात,डाळीच्या भाज्या, मसाला खिचडी दिली जाते. रात्रीला जेवण, हळयुक्त दूध व दुपारी 4 वा चहा व बिस्कीट दिले जाते.
विशेष बाब म्हणजे ड्युटीवरील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ ,अंबुलन्स ड्राइवर यांचीही जेवणाची व्यवस्था दररोज केली जाते. आज सर्व समाजातील सर्व बांधव हे अन्नछत्र अविरत सुरू राहावे यासाठी मदत करत आहेत. उद्योजक श्रीराम पाटील, चेतन पाटील,डॉ. मनीष चौधरी, डॉ. रितेश पाटिल , डॉ. राजेश पाटिल ज्ञानेश्वर बढे, मनोज पाटील, चंदन अत्तरदे, कुलभूषण पाटील, हिरेश कदम ,चंदन कोल्हे, किरण बच्छाव, अमोल धांडे, विजय देसाई, लीलाधर खडके, गोपाल दर्जी, महेश चौधरी, सुनील घोलप, हितेंद्र धांडे, विवेक पाटील, अक्षय कोल्हे, डॉन शर्मा. यासह या अनेक मान्यवरांनी भेट देवून कौतुक केले. हिरेश कदम व चंदन कोल्हे हे या ऊपक्रमाचे ऊत्कृष्ट नियोजन करीत आहेत.तसेच या ऊपक्रमासाठी ज्ञात,अज्ञात मंडळींनी आर्थीक,अन्न ,अंगमेहनत अशी भरपूर मदत लाभत आहे.