जळगाव – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय खेळातील अतिउच्च कामगिरीबाबत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व या खेळांचा प्रचार-प्रसार व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थाना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच ध्यानचंद पुरस्कार व विद्यापीठांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2021 च्या या पुरस्कारांकरीता नामनिर्देशांचे प्रस्ताव 21 जून, 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करावयाचे आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे केंद्र शासनामार्फत कळविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.
या पुरस्काराकरिता ज्या अर्जदारांना प्रस्ताव सादर करावयाचे असतील त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास [email protected] किंवा [email protected] या मेलवर सादर करावेत. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती नियमावली व विहित नमुन्यातील अर्ज केंद्र शासनाच्या https//yas.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.