जळगाव – म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुगांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुगणालयात पुरेशा सोयीसुविधा तसेच तज्ञ डॉक्टर असेल तरच या रुग्णालयांना उपचाराकरीता Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असून तसे परिपत्रक निर्गमित केले आहे.
जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुग्णांवर काही खाजगी रुग्णालयात डॉक्टर तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी काही सुचना निर्गमित केल्या आहेत. यात ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसीस आजारावर उपचार अथवा रुग्ण दाखल केले जातात. अशा रुग्णालयांमध्ये कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर, Opthalmologist, सर्जन (Oral Surgen) यांच्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास व जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविणे आवश्यक राहील. या रुग्णांलयामध्ये शस्त्रक्रिया (Surgical procedure) च्या बाबतीत Debridement, Enucleation करण्याच्या पुरेशा सोसी उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
या बाबींची पुर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच उपचाराकरीता जिल्हा शल्य चिकित्सक Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करतील याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी. या सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम नुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.