जळगाव – शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना शहरातील मयूर कॉलनीत आज शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडलीय. दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव असून योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत असे की, योगिता सोनार यांचे पतीचे सहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. ते आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत मयूर कॉलनीत राहतात. दरम्यान, मध्यंतरी घरात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते.