Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वायू दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात, एकाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
May 21, 2021
in राष्ट्रीय
0
वायू दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात, एकाचा मृत्यू

पंजाब, वृत्तसंस्था । भारतीय वायू दलाचे MiG-21 हे लढाऊ विमान मध्यरात्री उशिरा कोसळून अपघात झाला. पंजाबच्या मोगा शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. नियमित प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण घेतले होते, त्याचवेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन या विमानाने उड्डाण घेतलं होतं. पायलट अभिनव चौधरी यांनी सूरतगढवरुन जगरावच्या इनायतपुरा एअरबेससाठी उड्डाण घेतलं होतं. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास या विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये, पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती एसपी ( हेडक्वार्टर) गुरदीपसिंह यांनी दिली.

#BREAKING : An Indian Air Force #MiG21 fighter aircraft crashed near #Moga in #Punjab late last night. The aircraft was on a routine training sortie when the accident happened: #IAF officials#FighterJet pic.twitter.com/WpOuN3xAEx

— ज़ाहिद अब्बास ZAHID ABBAS 🇮🇳 (@abbaszahid24) May 21, 2021

मोगापासून 25 किमी अंतरावरील लंगियाना खुर्द या गावाजवळ ही दुर्घटना घडली. वातावरण खराब असल्याने बचाव पथक रात्री 11.00 वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशिक्षणासाठी हे विमान उडविण्यात आले होते. मात्र, विमान चालवत असताना कोसळण्याची चाहूल लागल्याने वैमानिक अभिवन यांनी विमानातून उडी घेतली. मात्र, शिर धडापासून वेगळं झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. विमान दुर्घटना झालेल्या ठिकाणापासून 8 एकर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

गावातील नागरिकांना रात्री 9.30 च्या सुमारास मोठा आवाज आला. त्यामुळे, घाबरलेल्या ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यावेळी ही विमान दुर्घटना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहींनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यावेळी, शेतजमिनीत 5 फूट खोलवर आत हे विमान शिरले होते. तर, विमानाचे तुकडे 100 फूट परिसरात पसरले होते.

An Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Moga in Punjab late last night. The aircraft was on a routine training sortie when the accident happened: IAF officials pic.twitter.com/7mNc5joJy8

— ANI (@ANI) May 21, 2021

Share post
Tags: #Moga#PunjabAccidentMarathi NewsPlaneएकाचा मृत्यूवायू दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात
Previous Post

तिसऱ्यांदा घसरले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा नवा दर

Next Post

गडचिरोलीत चकमकीत पोलिसांनी केले १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Next Post
गडचिरोलीत चकमकीत पोलिसांनी केले १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत चकमकीत पोलिसांनी केले १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group