चोपडा – मागील एक वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.सर्वच जनतेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही.त्यामधे शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये घट व शेतमालाला भाव नाही आणि त्यातच केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे.तसेच दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढतच आहेत.म्हणजेच आता शेतकरी वर्गाने काय करावे ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आता तालुक्यात खरीप हंगामापुर्वीच्या कामाला म्हणजेच मशागतीला सुरुवात झालेली आहे.शेतकरी वर्ग रासायनिक खते घेण्याकरीता जात आहेत मात्र खतांच्या भावात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे.त्यामुळे आज रोजी चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती त्वरीत कमी करण्यात याव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल.असे निवेदन उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांना देण्यात आले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील,अनुसुचित जाती जमाती सेल चे तालुकाध्यक्ष राजेंद्र धनगर,तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलींद सोनवणे,युवक तालुका प्रसिद्धी प्रमुख संदिप कोळी,महेश पाटील आदि उपस्थित होते.