मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाचे संकट त्यातच महागाईच्या झळा सोसत असतानाच आता इंधन दरवाढीचे चटके सर्व सामान्य नागरिकांना सोसावे लागत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका संपताच इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली.
मंगळवारी पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल प्रतिलिटर २४ ते २७ पैसे तर डिझेल २७ ते ३१ पैसे प्रतिलिटर नं वाढवलं आहे. देशात सर्वत्रच इंधन दरात वाढ झाली असून काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यामध्ये इंदौर, भोपाळ, परभणी आणि जयपूरसह काही शहरांचा समावेश आहे.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. ११ दिवस इंधन दरात वाढ पाहायला मिळत आहे. पेट्रोल २ रुपये ५० पैशांनी महागले आहे तर डिझेल २ रुपये ७८ पैशांनी महागले आहे.
प्रमुख शहरातील इंधन दर
शहर : पेट्रोल, डिझेल
दिल्ली : ९२.८५, ८३.५१
मुंबई : ९९.१४, ९०.७१
कोलकाता : ९२.९१, ८६.३५
चेन्नई : ९४.५४, ८८.३४
तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर कसे कराल चेक?
क्रूड तेलाच्या किमती आणि परकीय चलनाच्या दरानुसार देशातील इंधन दर बदलत असतात. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता देशातील इंधन दर सुधारित होतात. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सुधारित दर सकाळी सहा वाजलेपसून लागू होतात.
दरम्यान, फोन वरूनही इंधनाचे सुधारित दर आपण जाणून घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.