जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ६२२ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज दिवसभरामधून जिल्ह्यात १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर -६२, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-७२, अमळनेर-२५, चोपडा-४८, पाचोरा-२९, भडगाव-११, धरणगाव-१७, यावल-६१, एरंडोल-२०, जामनेर-३५, रावेर-५८, पारोळा-२७, चाळीसगाव-५४, मुक्ताईनगर-१९, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील १५ असे एकुण ६२२ बाधित रूग्ण आढळले आहे.
आज पर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ३५ हजार ७६४ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ६५६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालया उपचार घेत आहे. आज दिवसभरात १० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.