जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ७८९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर जिल्ह्यात आज १२ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ८१६ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-१२२, जळगाव ग्रामीण-२३, भुसावळ-१०६, अमळनेर-१६, चोपडा-३७, पाचोरा-२९, भडगाव-१५, धरणगाव-७, यावल-४१, एरंडोल-११, जामनेर-३०, रावेर-५०, पारोळा-२७, चाळीसगाव-८७, मुक्ताईनगर-१६१, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ३३ हजार २१२ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यापैकी १ लाख २० हजार ९७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ८५५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.