जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील सर्व पोलीस स्थानकाच्या हद्दीतील १५ दुचाकींची चोरी करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार १२ रोजी पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे व त्याच्याकडून १५ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
आरोपी उल्हास पाटील वय २० रा. पिंपळगाव बु. ता.जामनेर असे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्हयासह शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेश गोसावी, वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते.
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील पारदर्शी उल्हास पाटील हा तरुण जळगाव शहरात येवून दुचाकी चोरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाला. त्यानुसार पथकाने त्याला आज गुरुवारी अटक केली. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून सहा, जिल्हापेठ ७, जळगाव शहर पोलीस स्टेशन १ व शनिपेठ पोलीस स्थानकात एक अशाप्रकारे त्याने शहरातून १५ दुचाकी चोरल्याची कबूली दिली असून त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.


