जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज 1061 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून तर आज दिवसभरातून 936 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. तसेच आज 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा हजारच्या आत म्हणजेच ९३६ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ११६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीतांपेक्षा बरे होणार्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-१५३; जळगाव ग्रामीण-३४; भुसावळ-१३१; अमळनेर-९६; चोपडा-४२; पाचोरा-५८; भडगाव-१८; धरणगाव-२७; यावल-३३; एरंडोल-२६; जामनेर-५२; रावेर-६५; पारोळा-२२; चाळीसगाव-८६; मुक्ताईनगर-२५; बोदवड-४८ आणि इतर जिल्ह्यांमधील १७ असे रूग्ण आढळून आले आहेत.