पारोळा – येथील गटविकास अधिकारीपदी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
भारतीय प्रशासनीक सेवेतील अधिकारी शुभम गुप्ता यांनी प्रभारी गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांच्याकडून पदभार घेतला. त्यांच्याकडे पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून २८ ऑक्टोबर ते १८ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णवेळ स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे.
पदभार घेताच त्यांनी कार्यालयीन कर्मचार्यांची बैठक घेतली. कामकाजाच्या वेळेत कार्यालयात थांबणे व प्रत्येकाने शिस्तीने काम करावे, अशा सूचना केल्या. याआधी गुप्ता हे भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नाशिक येथे कार्यरत होते.