जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १०४८ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून तरी १०३० रूग्ण बरे होऊन घरी परतले. यात आज जिल्ह्यात दिवसभरामधून २१ बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा अकराशेच्या आत म्हणजेच १०४८ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये १०३० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात २१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-२०४; जळगाव ग्रामीण-२८; भुसावळ-९०; अमळनेर-८४; चोपडा-८४; पाचोरा-६३; भडगाव-२८; धरणगाव-३४; यावल-३७; एरंडोल-२०; जामनेर-१०५; रावेर-९७; पारोळा-४६; चाळीसगाव-५०; मुक्ताईनगर-३१; बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यांमधील ३१ असे रूग्ण आढळून आले आहेत.