मुंबई (वृत्तसंस्था) – सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचा नवा आकृतीबंध मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्युत शाखेचे बळकटीकरण होणार आहे.
या शाखेतील 716 नियमित पदांमध्ये 50 नवीन पदांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता (विद्युत) 3 पदे, सहायक मुख्य अभियंता-1 पद, कार्यकारी अभियंता-7 पदे, उप अभियंता-13 पदे, कनिष्ठ अभियंता-20 पदे, विभागीय लेखापाल-6 अशी ही पदे असतील. तांत्रिक पदांमध्ये वाढ करण्यात येणार असून अतांत्रिक पदांमध्ये कपात करण्यात येणार आहे.
त्यामुळे वार्षिक 15.38 कोटी रुपये बचत होईल तर 50 नवीन पदांसाठी 4.17 कोटी रुपये वाढीव खर्च येईल.