जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातून शेतकरी भाजीपाला व फळ विक्रीसाठी आणतात. तसेच लिलावानंतर किरकाेळ विक्रेते भाजीपाला व फळ खरेदी करून ठिकठिकाणी विक्रीसाठी जात असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी हाेऊन काेराेनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाभरातून त्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची महापालिकेने अँटीजेन टेस्ट करायला हवी. जेणेकरून काेराेनाचा संर्ग राेखणे शक्य हाेईल, अशी मागणी महापालिकेचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. |
|