जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११४७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर-२३६, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-१५३, अमळनेर-३८, चोपडा-१२४ , पाचोरा-२५, भडगाव-१९, धरणगाव-३८, यावल-३३, एरंडोल-७२, जामनेर-५५, रावेर-१३९, पारोळा-२७, चाळभ्सगाव-५५, मुक्ताईनगर-४१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण १ हजार १४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख १० हजार ४२४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९७ हजार ३६२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १०७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.