Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ एप्रिल २०२१

by Divya Jalgaon Team
April 19, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तमरित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते.

वृषभ:-सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

मिथुन:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.

कर्क:-तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.

सिंह:-उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कन्या:-मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.

तूळ:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल.

वृश्चिक:-कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

धनू:-लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका.

मकर:-डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.

कुंभ:-दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

मीन:-मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल.

Share post
Tags: १९ एप्रिल २०२१आजचे राशीभविष्यसोमवार
Previous Post

कुंभ ची तुलना मरकजशी कां नाही…..?

Next Post

एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, फक्त ९ रुपयांत मिळवा सिलिंडर

Next Post
फक्त एक मिस कॉल देऊन कसा बुक करायचा LPG सिलेंडर, जाणून घ्या

एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, फक्त ९ रुपयांत मिळवा सिलिंडर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group