जळगाव – शहरातील मेहरूण परिसरातील स्मशानभूमीत लोकसहभागातून तयार करण्यात येत असलेल्या ओट्यांच्या कामाची शनिवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली.
जळगावातील स्मशानभूमीत ओटे कमी पडत असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी लोकसहभागासाठी आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीराम खटोड व खुबचंद साहित्या यांनी तयारी दर्शवली होती. नेरीनाका स्मशानभूमीत ७ ओटे तयार करण्यात आले असून ५ ओटे मेहरूण स्मशानभूमीत तयार करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली.