चोपडा :- शहरातील महावीर नगरतील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक दिलीप सुकदेेेव साळुंखे याचे आज दि 10 एप्रिल रोजी दु:खद निधन झाले असून पुन्हा शिक्षक वर्गातील एकाचा कोरोनाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोना महामारीने प्रचंड धुमाकूळ घातला असून शैैैैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून भीतीयुक्त परििस्थितीनिर्माण झाली आहे. दिलीप सााळुंखे सरांनी गोरगावले येथील राजेंद्र माध्यमिक विद्यालयात 34 वर्षे सेवा बजावली असून त्यांचा शांत हसतमुख स्वभावाने सर्वांना आपलेसे केले होते. त्यांच्या दु:खद निधनाने शिक्षक वर्गात चाांगले व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तेे मुळ निवाासी अडावद येथील असून त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले असा परिवार आहे.


