Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनीच केला मुलाचा खून

by Divya Jalgaon Team
April 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी । प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनीच मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कैलास नगर भागात घडली होती. याबाबत शहर पोलिस स्थानकात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रताप कुमावत (रा. कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय ता. चाळीसगाव) याने विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी प्रेमविवाह केला होता.

मात्र त्याच्या विवाहाला घरून विरोध होता. त्याची आई अलका प्रताप कुमावत (वय-५६) व वडील प्रताप सहादु कुमावत (वय- ६४) त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध होता. यामुळे या कुटुंबात आधी देखील अनेकदा खटके उडाले होते. यातच १३ मार्च २०२० रोजी निलेश प्रताप कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

निलेशच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय ३५, रा. सदिच्छा नगर, धुळे ) यांनी चाळीसगाव न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाचे याची दखल घेत कलम-१५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने सी.आर.पी.सी कलम १५६ (३) च्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्यात दि. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री भादंवि कलम- ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलाच्या खून प्रकरणी आई-वडिलांच्या विरूध्दच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: ChalisgaoncrimeMarathi Newsप्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनीच केला मुलाचा खून
Previous Post

नाभिक समाजासह बारा बलुतेदार व्यावसायिकांना लॉकडाउन मधून वगळावे

Next Post

मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये!

Next Post
मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये!

मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group