मेष:- मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्यात भर पडेल.
मिथुन:- व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.
कर्क:- सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.
सिंह:- प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.
कन्या:- आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.
तूळ:- नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.
वृश्चिक:- व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधी उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.
धनू:- जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.
मकर:- गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.
कुंभ:- चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.
मीन:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.