जळगाव प्रतिनिधी । आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुककडून आपल्या मंचावर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणार्यांवर नियमितपणे लक्ष ठेवले जाते. या अनुषंगाने गेल्या वर्षी २६ मे ते २७ जून २०२० या एका महिन्यात अनेक युजर्संने लहान मुलांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्हिडिओ (चाइल्ड पॉर्नोग्राफी) अपलोड केल्याचे आढळून आले.
या अकाउंट्सची माहिती फेसबुकने संबंधित राज्यांच्या सायबर पोलिसांना दिली आहे. अशीच माहिती महाराष्ट्र सायबर विभागालाही मिळाली. त्या अनुशंगाने महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील संशयित अकाउंटची माहिती संबंधित सायबर पोलिस ठाण्यांना पत्राद्वारे कळवली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सौरभ संजय वाणी, अतुल व्यास, रॉकी पाटील, रेवती ठाकूर, सोनाली इंगळे, रक्षा सेठी (सर्वांचे पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) या सहा अकाउंट्सवरून आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड झाल्याचे आढळून आले आहे. सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून या सहा जणांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.नावे निष्पन्न झाल्यानंतर अटकमहाराष्ट्र सायबर विभागाकडून मिळालेल्या संबंधित अकाउंटच्या युजर्संवर गुन्हा दाखल केला आहे.
या अकाउंट्सची माहिती काढणे सुरू आहे. संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे हिरे यांनी सांगितले आहे.