Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दुकानातील काम करणाऱ्या नोकरांना चोरी करताना पकडले रंगेहात

by Divya Jalgaon Team
April 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
दुकानातील काम करणाऱ्या नोकरांना चोरी करताना पकडले रंगेहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात दुकानातील काम करणाऱ्या दोन जणांना चोरी करतांना रंगेहात पकडले. ही घटना 6 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील कंवरनगरातील रहिवासी मुकेश अर्जुनदास बाधवाणी (वय ४३) यांचे बळीरामपेठेत सतनाम हॅण्डूम नावाचे दुकान आहे या दुकानावर किरण दत्तू नन्नवरे व पंकज राजू कोळी हे दोघ गेल्या तीन वर्षांपासून कामाला आहे. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाधवाणी यांनी दुकान उघडले. त्यानंतद दुपारी २ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुकानासमोरील दुकानात ते भेटण्यासाठी गेले. त्यांना भेटून ते १० मिनिटात परत आले असता, त्यांना दुकानाच्या बाहेर पंकज कोळी हा मोटारसायकलवर बसून व त्याच्या मागे एक अनोळखी मुलगा बसलेला होता. त्यांच्याकडे युरीयाची व एक दुकानातील लेडीज गारमेंटची गोणी होती. त्यांनी बाधवाणी यांना बघताच एमएच १९ एएल १६६५ क्रमांकाच्या दुचाकीने पळून जात होते. पंकज व त्याच्या साथीदार दुचाकीवर पळून जात असतांना बाधवाणी यांना आराडाओरड करण्यास सुरुवात केली.

यावेळी आजूबाजूचे दुकानदार मुकेश समदाणी, अमर कुकरेजा, मयुरवा बाधवाणी, दिलीप कटारीया यांनी त्या दोघांना पकडून ठेवले. पंकज कोळी याने गेल्या काही दिवसांपूर्वी दुकानात चोरी केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता परंतु बाधवानी यांनी त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती. परंतु आत पुन्हा पंकज कोळी व किरण दत्तू नन्नवरे यांनी दुकानातील स्कार्फ गोणीत भरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. त्यांनी दुकानातील सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करुन घेवून जात असतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान किरण दत्तू नन्नवरे, पंकज राजू कोळी दोघ रा. जैनाबाद व राकेश प्रताप सपकाळे रा. दिनकर नगर यांच्याविरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonदुकानातील काम करणाऱ्या नोकरांना चोरी करताना पकडले रंगेहात
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ७ एप्रिल २०२१

Next Post

पेट्रोल – डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल - डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group