जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज नव्याने ११७६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात जळगाव जिल्ह्यात आज १५ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.
जळगाव शहर-३३३, जळगाव ग्रामीण-४१, भुसावळ-४२, अमळनेर-३४, चोपडा-२६२, पाचोरा-४३, भडगाव-८, धरणगाव-२८, यावल-८५, एरंडोल-४६, जामनेर-४८, रावेर-६१, पारोळा-३२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४५ आणि इतर जिल्ह्यातील १० असे एकुण १ हजार १७६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालात आजवर एकुण ९५ हजार ९५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८२ हजार ६०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ६४६ रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यातून १५ रूग्णांचा मृत्यू झाला असून यात जळगाव शहर-३, भुसावळ-२, बोदवड-२, चोपडा-२, जळगाव तालुका-१, भडगाव -१, धरणगाव १, एरंडोल-१, पारोळा -१ आणि जामनेर तालुक्यातील १ यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.