जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत कडक नियम लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात कडक नियम लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी काढले आहे.
दिलेल्या आदेशानुसार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार असून यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमावबंदी करण्यात आली आहे. तर शुक्रवार रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळाता जिल्ह्यात संचारबंदी केली आहे. यात नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक अथवा गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिलेले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले आदेश याप्रमाणे यात काय राहणार बंद आणि काय राहणा सुरू याची माहिती जाणून घ्या.
जिल्हावासीयांसाठी असे आहेत नियम
1) संचारबंदी व Night Curfew
a) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो संपूर्ण जळगांव जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.
b) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपावेतो संपूर्ण जळगांव जिल्हयात 05 पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई राहील.
c) दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून दिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो शुक्रवार रात्री 08.00 वाजेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.
d) वरील लागू करण्यात आलेल्या निबंधातून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक यांना सुट राहील. तथापि संबंधितांनी आपले ओळखपत्र सोबत माळगणे अनिवार्य राहील.
वरील प्रमाणे नियमांतून खालील प्रमाणे अत्यावश्यक सेवांना सुट राहील.
i ) हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक
ii) किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील)
iii ) रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा ( रेल्वे / बस / विमान द्वारे प्रवाशांना रात्री 08.00 ते सकाळी 07.00 वाजेदरम्यान प्रवास करण्यास व प्रवासाहून परत येण्यास परवानगी असेल. तथापि संबंधित प्रवासी यांनी रेल्वे / बस / विमान यांचे वैध असलेले तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य राहील)
2) बाह्य उपक्रम
a) सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक मैदाने हे रात्री 08.00 ते सकाळी 07.00 पावेतो बंद राहतील. तसेच शुक्रवारी रात्री 08.00 ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील.
b) सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपावेतो सार्वजनिक जागेवर वावरतांना सर्व नागरिकांनी जमावबंदी व कोविड-19 निर्देशांचे पालन करावे.
c) सार्वजनिक जागांचे ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी निरीक्षण करावे व कोविड निर्देशांचे उल्लंघन होत नसल्यास ते बंद करावेत.
3) शॉप, मार्केट व मॉल्स
a) सर्व Non- Essential दुकाने, मार्केट व मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सुरु राहतील.
b) अत्यावश्यक सेवा देणारे दुकान मालक व दुकानातील सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वया) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच सदर दुकानात कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधा वापरण्यात याव्यात,
c) अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने वगळून इतर बंद असलेल्या दुकान मालकांनी त्यांच्या दुकानात असलेल्या कर्मचा-यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सुविधांची पूर्व तयार करुन ठेवावी. जेणे करुन पुढील टप्प्यात उघडता येतील.
4) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
a) सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तीवर रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
b) चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्ती तसेच वाहन चालकावर प्रत्येकी रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
c) प्रत्येक वाहतूक फेरी झाल्यानंतर प्रवासी वाहन निर्जतुकीकरण करुन घेणे आवश्यक राहील.
d) सर्व सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्यास्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून वाहन चालक व वाहनातील कर्मचारी कोविड-19 निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. त्या रिपोर्टची वैधता 15 दिवसाची असेल. जर टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा चालक यांनी प्लास्टीक शोट / तत्सम प्रकारे प्रवाशापासून स्वत:चे विलगीकरण केलेले असल्यास त्याला यातून सुट देता येईल.
e) वरील प्रमाण सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनांवरील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी लसीकरण करुन न घेतल्यास किंवा RTPCR कोविड-19 निगेटीव्ह रिपोर्ट सोबत न बाळगल्यास अशा व्यक्तीवर रुपये 1000/- मात्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
f) सर्व संबंधित रेल्वे स्टेशन मास्तर यांनी लचे स्टेशनवर कोणीही प्रवासी विनामास्क फिरणार नाही तसेच रेल्वेमधील सर्वसाधारण बोगीमध्ये कोणीही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित रेल्वे स्टेशन मास्तर यांनी नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर रुपये 500/- मात्र प्रमाणे दंडात्मक कारवाई करावी.
5) खाजगी कार्यालये
a) को ऑपरेटीव्ह , पीएसयु व खाजगी बैंक, BSE/NSE, विज वितरण कंपनी, टेलीकॉम सेवा पुरवठादार, विमा/मेडीक्लेम कंपनी, औषधी वितरण / निर्मिती संबंधित कार्यालये वगळून इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
b) SEBI व SEBI अंतर्गत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर्स संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, गुंतवणूक व क्लिअरींग कारपोरेशन, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्था, RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्यवर्ती संस्था उदा.स्वतंत्र प्राथमिक डिलर्स, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, फायनान्शीअल मार्केट, सर्व प्रकारचे Non Banking वित्तीय संस्था, सर्व सुक्ष्म वित्तीय संस्था, वकिलांचे कार्यालये, कस्टम हाऊस एजंट / लसीकरण, औषधी व फार्मास्युटीकलशी संबंधित मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर इत्यादी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पावेतो सुरु राहतील. तथापि कार्यालयात उपस्थित राहणारे कर्मचारी यांनी लवकरात लवकर भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच कोविड लसीकरण न केलेल्या कर्मचारी यांना दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. सदर प्रमाणपत्राची वैधता 15 दिवसाची असेल, सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संविधतायर रुपये 1000/- मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल.
6) सर्व शासकीय कार्यालये
a) सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50% कर्मचारी यांच्या उपस्थितीतीबायत कार्यालय प्रमुख यांनी कोविड-19 प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा.
b) विज, पाणी , बैंकिंग व इतर वित्तीय सेवा देणारे कार्यालये 100% अधिकारी /कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.
c) सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील बैठका एकाहून अधिक कार्यालयाशी संबंधित असतील तर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात.
d) सर्व शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणा-या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी, अभ्यांगतांना शासकीय कार्यालयात प्रवेश असणार नाही. याकरीता सर्व कार्यालयांनी e-visitor / विशेष फोन हेल्पलाईन प्रणालीचा वापर करावा.
c) ज्या अभ्यांगतांना उपस्थित राहण्याबाबत प्रवेश पास देण्यात आला असेल त्या संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी अशा व्यक्तीकडेस 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश पास देऊ नये.
e) सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड-19 लसीकरण करून घेण्यात यावे.
7) खाजगी वाहतूक व्यवस्था
a) खाजगी वाहने व खाजगी बसेस यांना 5 एप्रिल, 2021 पासून केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपावेतो वाहतूक करता येईल. तसेच 05 एप्रिल, 2021 पासून तेदिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो शुक्रवार रात्री 8 वाजेपासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाच्या व्यतिरिक्त इतर वाहतूक करण्यास बंदी राहिल.
b) खाजगी बसेस मध्ये RTO द्वारे निर्धारीत करण्यात आलेल्या आसन क्षमतेसह वाहतूक करता येईल. तथापि अशा खाजगी वाहन किंवा बसेसमध्ये कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करणार नाही.
c) खाजगी बसेस मधील वाहन चालक व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण न झाल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून खाजगी बस मधील वाहन चालक व वाहनातील कर्मचारी यांनी कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. सदर प्रमाणपत्राची वैधता 15 दिवसाची असेल.
8) करमणूक व मनोरंजन सुविधा
a) सर्व सिनेमा हॉल्स, ड्रामा थिएटर्स, सभागृहे, मनोरंजन पार्कस/ आ्केड्स/ व्हिडीओ गेम पार्लर, वांटर पार्क,क्लब स्विमोग पूल, जिम व स्पोर्ट कॉम्प्लेक्सेस बंद राहतील.
b) वरील आस्थापनाशी संबंधित सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय। कोविड लसीकरण करुन घ्यावे. जेणे करुन अशी दुकाने कालांतराने कोविड-19 चा फेलावाची भिती न राहता उघडता येतील.
9) रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स
a) सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स व बार बंद राहतील. (अपवाद जे रहिवासी हॉटेलचे अविभाज्य भाग आहेत.)
b) सर्व रेस्टरेट/हॉटेल्स मानकांना टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलीव्हरी सुविधा या केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. तसेच शनिवार व रविवारी केवळ सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी सुविधा देता येईल. (म्हणजेचं कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर ऑर्डर देण्यास किंवा घेण्यास येता येणार नाही.)
c) रहिवासो हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट व बार हे केवळ in-house guest करीता सुरु राहतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत oustside guest यांना परवानगी असणार नाही.
d) होम डिलीव्हरी सुविधा पुरविणारे सर्व कर्मचारी यांनी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड लसीकरण न केलेल्या कर्मचारी यांना 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. सदर प्रमाणपत्राची वैधता 15 दिवसाची असेल.
e) कोविड -19 लसीकरण न केलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचाऱ्यांवर १ हजार रूपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित हॉटेल/ रेस्टॉरंट यांचेवर देखील रुपये 10 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच पुन्हा अशीच चूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात येईल. अशा प्रकारे दंडात्मक कारवाई अन्न प्रशासन, पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी.
10) धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे
a) सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.
b) धार्मिक स्थळावर नियमित पूजा-अर्चा करणा-या व्यवतीनी त्यांची नियमित पूजा-अर्चा ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश न देता सुरु ठेवावी.
c) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी /सेवक यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे.
d) धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लग्न समारंभ व अंत्यविधी कार्यक्रम हे अटी व शर्तीस अधिन राहून करता येतील.
11) केश कर्तनालय आणि ब्युटी पार्लर
a) केशकर्तन शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना बंद राहतील.
b) वरील ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. जेणे करुन पुढील टण्यात उघडता येतील.
12) वृत्तपत्रे
a) सर्व वृत्तपत्रांना वितरण व छपाई करता येईल.
b) सर्व वृत्तपत्रे हे दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत वितरीत करता येतील.
c) वरील आस्थापनाशी निगडीत सर्व कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार लवकरात लवकर (सद्य:स्थितीत 45 वर्षे वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. तसेच घरपोच वाटप करणाऱ्या कर्मचारी यांनी RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. त्याची वैधता 15 दिवस असेल. हा नियम दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून लागू राहील.
13) शाळा व महाविद्यालये
a) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद राहतील.
b) तथापि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस सुट राहील. परीक्षेचे कामकाज पाहणारा कर्मचारी वर्गाने एकतर लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.असे प्रमाणपत्र 48 तास वैध राहील.
c) बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याबाहेर घेण्यात येणा-या अशा कोणत्याही परिक्षा ज्या न देणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरु शकते त्याविषयी संबंधित विभागास सुचित करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
d) सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील.
e) कोणत्याही विद्यार्थ्यास परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 व शुक्रवार ते सोमवार रात्री 8. ते सकाळी 7 वाजे दरम्यान परिक्षा केंद्राच्या ठिकाणी व घरी जाण्यासाठी वैध असलेले प्रवेशपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
f) वरील ठिकाणी कार्यरत सर्व संबंधित कर्मचारी यांनी लवकरात लवकर भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45-चर्ष वय) कोविड लसीकरण करुन प्यावे. नेणे करुन अशा आस्थापना पुढील टण्यात उघडता येतील.
14) धार्मिक / सामाजिक / राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम
a) सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी असेल,
b) ज्या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यांच्या बाबतीत मेळाव्यासाठी या अटीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल.
a) कोणत्याही राजकीय मेळाव्यास भारत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार बंदीस्त सभागृहात 50 टक्के लोक किंवा 50 टक्के क्षमतेसह आणि मोकळया जागेत 200 लोक किया 50 टक्के समतेसह कोविड-19 नियमावलीचे पालन करुन परवानगी असेल.
b) अशा कोणत्याही प्रसंगाचे कोविड-19 नियमावलीचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतचे पर्यवेक्षण करण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.
c) कोविड-19 नियमावलीचे उल्लंघन झाल्यास जागा मालक यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल अथवा गंभीर स्वरुपाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ती जागा कोविड-19 आपत्तीचे निवारण होई पावेतो सिल करण्यात येईल.
d) कोणत्याही उमेदवाराने दोन वेळेस कोविड-19 नियमावलीचे उल्लंघन केलेले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचेशी संबंधित राजकीय मेळाव्यास जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येणार नाही,
e) इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी जसे रॅली, कॉर्नर मीटिंग्ज इ. सर्व कोविड 19 नियमावलीचे पालन करून करता येतील.
निवडणूक प्रक्रियेत सर्व मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी सर्व सहभागीना समानतेने करण्यात याव्यात आणि कोणत्याही प्रकारची तक्रारी उद्भवू नयेत याकरीता नियाक्षणातीपाणं मार्गदर्शक तत्वांचा अवलब करण्यात यावा.
c) लग्न समारंभ :
1 लग्न समारंभ हे 20 लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येतील. तसेच मॅरेज हॉल मधील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
2) कोविड -19 लसीकरण करुन न घेतलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचा-यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापना यांचेवर देखील रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
3) सदर जागेमध्ये पुन्हा वरील प्रमाणे उल्लंघन केल्यास अशा आस्थापना सिल करण्यात येतील व कोविड-19 आपत्तीचे निराकरण होईपावेतो अशा आस्थापनांना परवानगी असणार नाही.
4) लग्नसमारंभ हे शनिवार, रविवारी शक्यतो टाळावे. पूर्वनियोजित असल्यास अटी शर्तीनुसार कार्यक्रमाकरिता स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
5) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल. तथापि अंत्यविधी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एकतर लवकरात लवकर भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्यःस्थितीत 45 वर्ष वय) काविड लसीकरण करुन घ्यावे किंवा कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील,
15) उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणेबाबत
a) विक्रीच्या जागेवर खाण्यासाठी कोणासही खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. तसेच विक्रीसाठीचे पदार्थ झाकून ठेवण्यात यावे. तथापि पार्सल किंवा होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7. ते रात्री 8 या वेळेत देता येईल.
b) रांगेत वाट पाहणाऱ्या ग्राहकांनी काऊंटरपासून लांब उभे रहावे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
१६) बांधकामाबाबत
a) बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे अशाच ठिकाणचे बांधकामे सुरु राहतील,
b) कामगारांना ये-जा करण्यास बंदी राहील. तथापि बांधकाम साहित्याची ने-आण करण्यास मुभा राहील.
c) बांधकामाच्या ठिकाणातील सर्व कामगार / कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) एकतर लसीकरण करुन घ्यावे किंवा लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनो कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. त्याची वैधता 15 दिवस राहील. हा नियम १० एप्रिल पासून लागू राहिल.
याप्रमाणे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांसह संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई किंवा वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.