जळगाव – शहरातील दाणाबाजार परिसरात माल घेण्यासाठी आलेले दोन व्यापाऱ्यांची पैशाने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी शहर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथील किराणा दुकान व्यावसायिक उमेश रमेश कासट (वय- ४२) हे किराणा माल घेण्यासाठी दाणा बाजारातील लिकासन ट्रेडर्स येथे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता आले होते. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये किराणा माल भरण्यासाठी लागणारी उधारीची चोपडी व दिड लाख रुपये रोख रक्कम होती. ते दुकानात आले व घाईगडबडीत हातातील कापडी बॅग लिकासन ट्रेडर्स दुकानाचे बाहेरील टेबलावर ठेवली.
त्यावेळी ते काही कामासाठी दुकानांबाहेरउभे होते. त्याच वेळी एक अनोळखी व्यक्तीने ते पैशाची कापडी पिशवी घेऊन पळतांना दिसला व लगेच त्याठिकाणावरून पळून गेला. त्यांनी लागलीच ही बाब त्या दुकानांबाहेर असलेले नागरिकांना सांगितले तसेच हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शहर पोलिसात उमेश रमेश कासट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.