जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी मालक बबनकुमार प्रल्हाद सोनी (वय ४३) हे सदाशिव नगर येथील रहिवाशी आहे. ते गाडेगाव येथील सुप्रिम कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून कामाला आहेत. गाडेगाव येथील कंपनीत जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १३ बीसी १०४३) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे २३ रोजी त्यांनी अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी उभी केली होती. यांनतर बसने ते ड्युटीवर गेले. रात्री ११.३० वाजता परत आले असता त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे आढळुन आले. त्यांनी दुचाकी लावलेल्या ठिकाणाचा परिसर पिंजून काढला होता.
दुचाकी मिळून आली नसल्याने त्यांनी २४ मार्च रोजी ऑनलाईन तक्रार केली होती. आठ दिवसानंतर आज ३१ मार्च रोजी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.