Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महावितरणचे 65 लाख वीजग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

जळगाव परिमंडळात 3 लाख ग्राहक झाले डिजिटल

by Divya Jalgaon Team
March 31, 2021
in जळगाव, प्रशासन
0
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

जळगाव : लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे राज्यातील 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांच्या तर जळगाव परिमंडलात 2 लाख 94 हजार वीजग्राहक 58 कोटी 38 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय,‍ भिम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेट बँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईन होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल ॲपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलही देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत जळगाव परिमंडलात 2 लाख 94 हजार वीजग्राहक 58 कोटी 38 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share post
Tags: #DigitalCustomerJalgaonMahavitaranMarathi NewsOnline Paymentमहावितरणचे 65 लाख वीजग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन
Previous Post

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

Next Post

सोने आज पुन्हा झाले स्वस्त, पहा 10 ग्रॅमचा काय आहे दर?

Next Post
सोने - चांदी खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

सोने आज पुन्हा झाले स्वस्त, पहा 10 ग्रॅमचा काय आहे दर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group