Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना अँटीजन विनामूल्य तपासणी केंद्राला सुरुवात!

by Divya Jalgaon Team
March 27, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
कोरोना अँटीजन विनामूल्य तपासणी केंद्राला सुरुवात!

जळगाव – सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ अँटीजन तपासणी केंद्र शनिवारी सुरु करण्यात आले.

उदघाटन प्रसंगी महापौर सौ.जयश्री महाजन, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा उपस्थित होते.

रेडक्रॉस संस्थेचे कार्य नेहमी उत्तम असते. कोरोना काळात त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असून जळगावकरांना त्याचा नेहमी फायदा होत असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

अँटीजन तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महानगरपालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल, शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे. सद्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे आणि रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास उपचार लवकर करणे शक्य होईल. या सर्व बाबींचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येत आहे. तसेच रविवारी देखील हि सेवा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. या तपासणी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी केले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsकोरोना अँटीजन विनामूल्य तपासणी केंद्राला सुरुवात!
Previous Post

जिल्ह्यात आज ११२४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले; जळगावात ४०० बाधित

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २८ मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २८ मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group