Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज आमदार चव्हाणांसह अन्य सहकारी न्यायालयात हजर करणार

by Divya Jalgaon Team
March 27, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव, राजकीय
0
आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

जळगाव प्रतिनिधी । शनिवार 26 रोजी दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना आ. मंगेश चव्हाण व अन्य सहकारी यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर काल सायंकाळी औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी जळगावच्या सहकार औद्योगीक वसाहतीमध्ये असणार्‍या वीज परिमंडळाच्या कार्यालयात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील शेतकर्‍यांसह अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांच्या भेटीसाठी आले.

याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांच्या वीजचे कनेक्शन तोडल्याबद्दल विचारणा केली. याप्रसंगी फारूकी यांना हमरातुमरी करण्यात आली. त्यांना खुर्चीला बांधून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र एमआयडीसी पोलीस पोहचल्याने हे शक्य झाले नाही. तसेच आंदोलकांनी वीज परिमंडळ कार्यालयात कुलूप ठोकले. या प्रकरणी लागलीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा समावेश होता. तर रात्री या संदर्भात औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण आणि इतरांवर लावण्यात आलेली कलमे पाहता त्यांच्यासह इतरांची पोलीस कोठडी मागण्यात येईल असे मानले जात आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMLA Mangesh ChavhanPolicePoliticalआज आमदार चव्हाणांसह अन्य सहकारी न्यायालयात हजर करणार
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २७ मार्च २०२१

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार

Next Post
…भाऊ…’घोडेबाजारा’ची वाट आपलीच ना?

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group