मुक्ताईनगर प्रतिनिधी । हॉटेल राजेमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून ५१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून व त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार २२० रुपयांच्या रोख रकमेसह वाहने व मोबाइल जप्त केले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे धुपेश्वर रस्त्यालगतच्या हॉटेल राजेच्या हॉलमध्ये नियमितपणे जुगार सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर पथक तयार करून येथे रविवारी सायंकाळी छापा टाकला.
जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना हॉटेल राजेमध्ये सुरु असलेल्या जुगाराबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कुर्हा गावातील हॉटेल राजवर छापा टाकला. यावेळी येथे जुगाराचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. या कारवाईत ५१ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ५९ हजार २२० रुपयांच्या रोख रकमेसह वाहने व मोबाइल जप्त केले आहेत.
जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा; भुसावळचे सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे अय्याज सय्यद, समाधान पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, हेमंत जांगडे, प्रकाश कोकाटे, विजय अहिरे आदींचा सहभाग होता. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.