धरणगाव – तालुक्यातील रेल येथे महाराजस्व अभियानांतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका यासह विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नायब तहसीलदार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, मंडळाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह रेल गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सर्व शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे बऱ्याचअंशी प्रत्यक्ष लेखी परीक्षेचा सराव कमी होत आहे. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सोशल डिस्टन्नसिंग पालन करुन लेखी सराव परीक्षा घेण्यात आली. सर्व परीक्षार्थींना पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर इत्यादी लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. या पालकांना उद्देशुन प्रमाणपत्र देण्यात आले.