जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी येथे बारदान गोडावूनला अचानक आग लागल्याची घटना 17 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले. याप्रकरणी 18 मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्थानकात आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे.
सत्यानारायण रामप्रताप बालदी (वय-६४) रा. जळगाव यांचे एमआयडीसीतीत ई-सेक्टरमधील दालमील कंपनी आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीच्या आवारात असलेल्या बारदान गोडावून मध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणाऱ्या मजूरांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली.
तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला बोलावून रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली अशी माहिती एमआयडीसी पोलीसांनी दिली. लागलेल्या आगीत सुमारे 8 लाख रूपये किंमतीचा किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाले आहे.
सत्यानारायण बालदी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.