नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सोन्या-चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोने-चांदीच्या किमती (Gold Silver Rate Today) सलग चौथ्या दिवशी वाढल्यात. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 105 रुपयांची वाढ झालीय. औद्योगिक मागणीतील तेजीमुळे चांदीचे दरही वाढलेत. एक किलो चांदीच्या किमती (Silver Price) मध्ये 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. देशांतर्गत बाजारातील तेजीच्या उलट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर कमकुवत होते.
सोन्याची नवी किंमत (Gold Rate on 18 March 2021)
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किमती 105 रुपयांनी वाढून 44,509 रुपयांवर आल्यात.
मागील व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 44,404 रुपयांवर बंद झाला होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,738 डॉलरवर आलीय.
चांदीची नवी किंमत (Silver Rate on 18 March 2021)
आज चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 1,073 रुपयांनी वाढून 67,364 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 66,291 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 26.36 डॉलर प्रति औंस राहिला होता.
सोन्याच्या वाढीची कारणे
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किमती 105 रुपयांनी वाढल्यात. यामुळे जागतिक सोन्याच्या किमतींमध्ये एका रात्रीत वाढ दिसून आली. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, डॉलरवरील वाढत्या दबावामुळे सोन्याला मजबुती मिळाली. दोन दिवसांच्या धोरणात्मक बैठकीनंतर यूएस फेडने गुंतवणूकदारांना खात्री दिली की, 2023 पर्यंत आपला मूलभूत व्याजदर शून्याजवळ राहील. गुरुवारी COMEX (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) येथे सोन्याच्या किमती किरकोळ घसरून 1,738 डॉलर प्रति औंस झाल्या, असंही तपन पटेल यांनी सांगितले.
100 रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करा
मायक्रो सेव्हिंग फिनटेक प्लॅटफॉर्म सिप्लीने (Siply) सिप्ली गॅरंटीड गोल्ड सेव्हिंग्ज योजना सुरू केली. यामध्ये दर आठवड्याला किमान 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. यामध्ये गुंतवणूकदारास तीन महिन्यांत 10% जादा सोने मिळू शकेल, तर बहुतेक दागिन्यांनी (11-12 महिन्यांपर्यंत) देऊ केलेल्या योजनांमध्ये सध्याचा बाजार दर 8.33% आहे.