जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज 996 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले व 7 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये तब्बल ९९६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ५३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अर्थात, आता रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्यांची संख्या देखील वाढू लागल्याची बाब दिसून आली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधीक २१७ पेशंट आढळून आले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे चोपडा तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १८१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सात कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या बळींची संख्या १४६२ इतकी झालेली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या ८५५० रूग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती सुध्दा प्रशासनाने दिली आहे.
आज जळगाव शहर- २१७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४२, अमळनेर-९१, चोपडा-१८१, पाचोरा-६५, भडगाव-१९, धरणगाव-७८, यावल-४०, एरंडोल-५५, जामनेर-६०, रावेर-२१, पारोळा-२८, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण९९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार ५७१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६३ हजार ५५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८ हजार ५५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकुण जिल्ह्यात १ हजार ४६२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.