Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती!

रुग्ण, नागरिकांशी साधला संवाद : दररोज ३५० वर नागरिकांना दिली जाते लस

by Divya Jalgaon Team
March 17, 2021
in आरोग्य, जळगाव
0
महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती!

जळगाव – शहर मनपाच्या मावळत्या महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शेवटच्या दिवशी देखील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. तसेच मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद देखील साधला. महापौर पदाचा शेवटचा दिवस असला तरीही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपले कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसूर केली नाही.

जळगाव शहराच्या विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपणार आहे. गेल्या वर्षभर कोरोना काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महापौर सौ.भारती सोनवणे या शेवटच्या दिवशी देखील जनसेवा करण्यात व्यस्त होत्या. जळगाव मनपात महापौर पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर सौ.भारती सोनवणे यांनी छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. जेष्ठ नागरिक आणि पहिल्या फळीतील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.

*कोविड सेंटरला केली पाहणी*
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नेहमीप्रमाणे दुपारी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कोविड सेंटरमधील सोयसुविधांची माहिती घेतली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

Share post
Tags: Covid HospitalJalgaonMahapaurमहापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्णलसीकरणाची माहिती!
Previous Post

धक्कादायक : नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता, पोलिसात तक्रार

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group