जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाजन यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आमदार गिरीश महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षणे जाणवत होती.
या अनुषंगाने चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जामनेरमध्ये क्वॉरंटाईन होऊन त्यांनी उपचार सुरू केले आहेत. जळगाव महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पडली असून राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. अर्थात, त्यांनी सर्व घडामोडींचा आढावा ते स्मार्टफोनवरून घेत आहेत.